पाण्यासाठी मदनवाडी तलावात मुंडण

  • कोरड्या तलावात बोंबाबोंब आंदोलन : आंदोलन उग्र करण्याचा इशारा

डिकसळ – पुणे शहरासह मावळ विभागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरणासह सर्व धरणे भरली मात्र, जिल्ह्यातील काही तलाव अद्यापही कोरडेच असल्याने शेतीसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाली आहे. पण, गेली पाच वर्षांपासून मदनवाडी (ता. इंदापूर) तलाव कोरडा पडला आहे. वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी करूनही तलावात पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांनी तलावात आज (बुधवारी) बोंबाबोंब आंदोलन करून सरकार आणि जलसंपदा विभागाच्या विरोधात घोषणा देत मुंडण करून निषेध व्यक्‍त केला. दरम्यान, जलसंपदा विभागाने या आंदोलनाची दखल घेतली असून रविवारी (दि. 2) पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले आहे.
मदनवाडी तलाव गेल्या 5 वर्षांपासून कोरडाठाक पडलेला आहे. मागील काळात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ निर्माण झाला होता. पण, यावर्षी ही या भागात पाऊस कमी झाला आहे. पण पुणे भागातील धरण साखळीत पाऊस मोठ्याप्रमाणात झालेला आहे. पाऊस सुरू असताना या शासनाने नदीद्वारे पाणी खाली सोडून वाया घालवले, पण हेच वाया जाणारे पाणी कालव्याद्वारे सोडून मदनवाडी तलाव भरून घेतला असता, तर आज या भागातील सिद्धेश्‍वर निंबोडी मदनवाडी पिंपळे-शेटफळगढे स्वामी चिंचोली पारवडी या लहान खेड्यांना पाण्याची वणवण करण्याची वेळ आली नसती, अशी खंत यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली. अनेकवेळा या भागातील नागरिकांनी मदनवाडी तलावात पाणी सोडण्याची करूनही याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ देवकाते यांनी केला. यावेळी गणपत ढवळे, गणेश साळुंके, सूरज बंडगर, आबासाहेब बंडगर, राजेंद्र धुमाळ, बबलू भोसले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न
    मदनवाडी हा तलाव 1952 मध्ये या भागातील लोकांचे पिण्याचे पाण्यासाठी बांधण्यात आला मात्र, 1952 पासून 2011 पर्यंत या तलावात कधीही पाणी आटले नाही. कारण जरी पाऊस कमी प्रमाणात पडला तरी वरील धरणातून पाणी सोडून हा तलाव भरण्यात येत होता पण, 2011 नंतर मात्र, पाऊस कमी पडू लागला आणि या भागातील लोकांना दुष्काळ जाणवू लागला आहे, त्या दुष्काळाने आजपर्यंत पाठ सोडली नाही. या तलावात पाणी नसल्यामुळे या भागातील ग्रामस्थांचे हाल होत आहेत.त्याचबरोबर शेतीचे पाण्याचा मोठा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यासोबत या भागातील पाळीव जनावरे वन्यपक्षांचे हाल होऊ लागलेत पाणी लवकरात लवकर न सोडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)