पाण्याअभावी फळबागा जळू लागल्या

अणे- नळवणे (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यापर्यंत टॅंकरने विकत पाणी घालून जगवलेल्या फळबागा आता पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. भानुदास हाडवळे यांच्या शेतातील आंब्याच्या बागातील 35 ते 40 झाडे पाण्याअभावी जळून गेली आहेत, तसेच रामचंद्र गुंड यांच्या बागातील काही आंब्याची झाडं जळून गेली आहेत. अशोक गुंड या शेतकऱ्याचे चिक्कूची काही झाडे जळून गेली आहेत. जून महिन्यापर्यंत जतन केलेली बाग आता जळून गेल्याने शेतकरी राजा हाताश झाला आहे.

टॅंकर विकत पाणी घालणं आता परवडत नसल्याने फळबागा जळू लागल्या आहेत. प्रशासनाने आमच्या फळबागांचा पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी असणाऱ्या या भयंकर दुष्काळात शेतकऱ्यांनी आपल्या बागा सात ते आठ महिने जपल्या; परंतु विकत पाणी घेऊन या फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या मुश्‍कील झाले आहे. विकत पाणी घेऊन बागांना देण्याचा शेतकरी थांबवली असल्याने बागा आता शेतकऱ्यांच्या जुळू लागल्या आहेत. जून महिना चालू झाला असल्याने आता शेतकरी पावसाची वाट पाहू लागले आहेत.

हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा या पाण्याअभावी जात असल्याचे चित्र पठारभागावर साध्य दिसून येत आहे. भानुदास हाडवळे यांच्या आंब्याच्या बागेत फळं आलेली झाडेसुद्धा पाण्याअभावी जळून चाललेले आहेत. डाळिंब, चिक्‍कू, आंबा अशा फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या फळबागा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जळून जाताना दिसत आहेत. दुष्काळ पडला असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी मात्र सरकारने निराशा दिली आहे. जळलेल्या फळबागांचे नुकसान भरपाई आम्हाला ताबडतोब मिळावी, अशी या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.