पाणीपुरवठा दोन दिवस बंद

पुणे – उजवा मुठा कालव्याची दुरुस्ती तातडीने हाती घेण्यात आली आहे. मात्र त्या दुरुस्तीला दोन दिवस लागणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या कालव्यातून लष्कर जलकेंद्राला पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे लष्कर भागातील पाणीपुरवठ्यावरही दोन दिवस परिणाम होणार असून, या भागात दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

मुठा उजव्या कालव्याच्या दुर्घटनेमुळे गुरुवारी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहेच; परंतु पुढील दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीतच राहणार आहे. वास्तविक गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असल्याची घोषणा महापालिकेने केली होती. तसेच शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पुरवठा होईल असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी केवळ एकच दिवसाची पाण्याची तरतूद करून ठेवली आहे. ही भिंत बांधण्यासाठी दोन दिवस लागणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे कोंढवा, मुंढवा, हडपसर, महमंदवाडी, काळेपडळ, येरवडा, कोरेगावपार्क, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगांवशेरी, चंदननगर, नगररोड, विमाननगर इत्यादी भागाचा पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रविण गेडाम यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)