‘पाठविलेला ई-मेल आता परत घेता घेणार’

जीमेल अँड्रॉइड अॅपवर आले नवीन फिचर

गुगलने जीमेलच्या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये आणखी एक नवीन फिचर उपलब्ध करून दिले आहे. आयओएसनंतर आता अँड्रॉइड यूजर्ससाठी गुगलने जीमेलच्या अँड्रॉइड अॅपमध्ये ‘अंडू सेंड’ (Undo Send) हे फिचर आणले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील अनेक दिवसांपासून युजर्स या फिचरची वाट पाहत होते. अनेक वर्षे या नविन फिचरची टेस्टिंग केल्यानंतर कंपनीने मध्ये अंडू सेंड (Undo Send) हे फिचर लॉन्च केले होते. या फिचरच्या साहाय्याने पाठविलेला ई-मेल आपण परत घेऊ शकतो. हे फिचर नवीन तसे नाही. नोव्हेंबरमध्ये जीमेल अंडू सेंड (Gmail Undo Send) हे फिचर आयओएस युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले होते. आता हे फिचर अँड्रॉइडसाठीही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अँड्रॉइड युजर्ससाठी जीमेल अंडू सेंड (Gmail Undo Send) हे फिचर व्हर्जन 8.7 मध्ये उपलब्ध असेल. हे फिचर डेस्कटॉप व्हर्जन सारखेच काम करेल. ई-मेल पाठविल्यानंतर खाली एक बॉक्‍स ओपन होईल. ज्यामध्ये सेंडिंग (Sending) लिहलेले दिसेल. त्याचबरोबर कॅन्सलचा (cancel) सुध्दा पर्याय दिसेल. जीमेलच्या 8.7 व्हर्जनमध्ये हे फिचर सर्व युजर्संना वापरता येईल. जर हे फिचर तुमच्या मोबाईल जीमेल ऍपमध्ये दिसत नसेल तर गुगल स्टोअरमध्ये जाऊन लेटेस्ट जीमेल 8.7 व्हर्जन डाऊनलोड करा किंवा जीमेल अपडेट करा.

मार्चमध्ये हे फिचर आल्यानंतर आणि लॉन्च होईपर्यत अंडू सेंड (Undo Send) हे फिचर जीमेल लॅबमध्ये (Gmail Lab) मध्ये टेस्टिंग फेजमध्ये होते. याआधी हे फिचर वेब व्हर्जनसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

नुकतेच गूगलने जीमेलमध्ये कॉन्फिडेंशियल मोड हे फिचर उपलब्ध करून दिले होते. हे फिचर सुरू केल्यानंतर युजरने एखाद्याला ई-मेल केला असेल तर नियोजित वेळनंतर तो ई-मेल डिलीट होईल.

– स्वप्निल हजारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)