पाठलाग करून विद्यार्थिनीचा विनयभंग

पिंपरी – पाठलाग करून मनाविरुद्ध लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास एमआयीडीस भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गेल्या दोन वर्षापासून सुरु होता.

17 वर्षीय विद्यार्थिनीने याप्रकरणी फिर्याद दिली. यावरून रुपेश मलकु जाधव (वय-20 रा. भोसरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 2017 पासून पीडितेचा पाठलाग करत होता. यावेळी तो तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जवळीक साधण्याच प्रयत्न करती होता. यावेळी पीडितेने त्याला एकदा जाब विचारण्याच प्रयत्न केला असता त्याने पीडिताला चापट मारली तसेच 21 फेब्रुवारी रोजीही त्याने मला का बोलत नाहीस यावरून मारहाण केली. पीडिताने तक्रार केल्यानंतर याप्रकरणी एमयाडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)