पाटस टोलनाका प्रशासनाने घेतली दखल

प्रभात प्रभाव

उघडा असलेला चेंबर तातडीने सिमेंट कॉंक्रिटने केला बंद

रावणगाव (ता. दौंड) – “पाटस टोलनाका प्रशासनाचे रस्ता देखभालीकडे दुर्लक्ष’ अशा आशयाची बातमी दैनिक “प्रभात’मध्ये रविवारी (दि. 17) प्रसिद्ध झाल्यानंतर, या बातमीने पाटस टोल प्रशासनाचा भोंगळ कारभार उजेडात आणला. त्यात रावणगावमध्ये हाय-वे लगत शिर्सुफळ कालव्याच्या कॅनॉलवरील चेंबर उघडे असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. या धोकादायक उघड्या चेंबरमुळे या परिसरात सतत छोटे मोठे अपघात घडत होते, तसेच मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र, या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने हे उघडे चेंबर त्वरीत बंद केले आहे.
टोल अधिकारी आपली कोणतीही कामे व्यवस्थित करत नसल्याचे यावरून दिसून येत होते. त्यामुळे नक्की कोणती कामे अधिकारी करत आहेत, हा प्रश्न सामन्य जनतेला पडत होता. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिक करत आहेत. याबाबत पाटस टोल व्यवस्थापनाशी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली गेली होती; पण दैनिक “प्रभात’मधील बातमीची दखल घेऊन या उघड्या चेंबरमुळे होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेची जाणीव झाल्याने पाटस टोल नाक्‍याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि त्वरीत लेबरच्या साहाय्याने हा उघडा चेंबर दुरुस्त केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी दैनिक “प्रभात’चे आभार मानले आहेत.

  • रावणगाव येथे हाय-वे लगत शिर्सुफळ कालव्याच्या कॅनॉलवरील चेंबर उघडे असून ते त्वरीत बंद करण्यात यावे याबाबम टोल प्रशासनाकडे आम्ही वारंवार मागणी करत होतो; पण टोल प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत होते. मात्र, दैनिक “प्रभात’मुळे पाटस टोलचे अधिकारी जागे झाले, आणि बातमीची दखल घेत त्यांनी हे चेंबर बंद केले आहे.
    – कुमार चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रावणगाव,

Leave A Reply

Your email address will not be published.