पाटण-नाटोशी बसचा पाटा तुटून अपघात; दोघे जखमी

पाटण, दि. 24 (प्रतिनिधी) – मोरणा विभागातील वाडीकोतावडे पुलाजवळ पाटण डेपोच्या एसटी बसचा पाटा तुटल्याने बसच्या झालेल्या अपघातात बसमधील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. जखमींवर पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन एकास अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलिसात झाली आहे.
याबाबत प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पाटण आगाराची पाटण-नाटोशी बस क्र. एम. एच. ई. एफ. 6121 ही नाटोशीमधून 5.30 सुटणारी एसटी बस पाटणच्या दिशेने येत होती. मोरणा विभागातील वाडीकोतावडे पूल ओलांडून एसटी बस पुढे आली असता अचानक एसटी बसचा पाटा तुटल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवून बस रस्त्यालगत उभी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी एसटी मधील सुरेश मारुती शिर्के (वय 43) व जयश्री प्रशांत आगाणे ( वय 24 दोघे रा. नाटोशी, ता. पाटण) हे दोनजण गंभीर जखमी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.