पाच देशांच्या कर्णधारांना बुकींकडून संपर्क – ऍलेक्‍स मार्शल

दुबई: नव्वदीच्या दशकात गाजलेल्या फिक्‍सींग प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्‍व पूर्णपणे हादरून गेलं होतं. भारतासह अनेक देशांचे खेळाडू हे बुकींच्या संपर्कात आलेले होते. यानंतर आयसीसी व संबंधित देशांच्या क्रिकेट संस्थांनी फिक्‍सींगविरोधात कडक भूमिका घेत बुकींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली.

मात्र, आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख ऍलेक्‍स मार्शल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभराच्या काळात 5 देशांच्या कर्णधारांना बुकींनी संपर्क केल्याचं समजत आहे. यातील 4 देशांचे कर्णधार हे आयसीसीचे सदस्य देशांचे असून एक कर्णधार हा संलग्न देशाचा कर्णधार आहे. मात्र या पाचही कर्णधारांनी ही बाब वेळेतच आपल्याकडे सांगितल्याचंही मार्शल यांनी म्हटल आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2017 साली “द गार्डीयन’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा सरफराज अहमद आणि झिम्बाब्वेच्या ग्रॅमी क्रिमर या खेळाडूंना बुकींनी संपर्क साधला होता. मात्र दोन्ही खेळाडूंनी ही ऑफर धुडकावून लावत संबंधित यंत्रणांना यासंदर्भात तक्रार केली. नुकतचं अफगाणिस्तान क्रिकेट प्रशासनाने आयसीसीकडे आपला खेळाडू मोहम्मद शेहजादला स्पॉट फिक्‍सींगची ऑफर आल्याची तक्रार केली होती. अफगाणिस्तानच्या टी-20 लिगमध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी न करण्यासाठी शेहजादला ऑफर देण्यात आली होती. मात्र शेहजादने यासंबंधी क्रिकेट बोर्डाला माहिती दिली.

मध्यंतरी अल जझिरा, इंडिया टुडे सारख्या वृत्तसंस्थांनी स्टिंग ऑपरेशद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे फिक्‍सींग होत असल्याचा दावा केला होता. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यातही पुणे येथील वन-डे सामन्याआधी इंडिया टुडे वाहिनीने पैशांच्या मोबदल्यात हवी तशी खेळपट्टी बनवता येते असं दाखवलं होतं. मात्र हे आरोप आयसीसीच्या चौकशीत सिद्ध होऊ शकले नाहीत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)