पाच आरोपींना जन्मठेप

अकलूज- माळशिरस तालुक्‍यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या संग्रामनगर, अकलूज येथील रणजित देवकर खून खटल्याचा निकाल लागला असून, माळशिरस जिल्हा सत्र न्यायालयाने पाच यांची यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
अकलूज येथे मागील भांडणाचा राग मनात धरून रणजित देवकर याचा खून केल्याप्रकरणी दशरथ माने, बालाजी कोळी, सचिन जाधव, नितीन जगदाळे, अतुल ऊर्फ पिंटू मोहिते या पाच आरोपींना जन्मठेप, एक वर्ष साधी कैद आणि प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटच्यावर मागील भांडणाचा राग लक्षात ठेवून अकलुज येथे दशरथ माने, सचिन जाधव, बाल्या कोळी, भैया इंगळे, श्रावण भोरकडे, नितीन जगदाळे यांनी तलवार व कोयत्याने वार केले आणि मोटारसायकलवरून अकलुज येथील संग्रामनगर गिरझणी या रस्त्याने निघून गेले.यात रणजित देवकर याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अकलुज पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वासराव साळोखे यांनी तपास करून आरोपींना खास पथकाद्वारे अटक केली होती. या खटल्यात एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी विक्रम कांबळेबरोबरच शवविच्छेदन करणारे डॉक्‍टर प्रवीण शिंदे, घटनास्थळाचा पंचनामा, तपास पोलीस निरीक्षक साळोखे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यामध्ये फिर्यादी सरकार पक्षातर्फे ऍड. संतोष न्हावकर आणि ऍड. संग्राम पाटील यांनी, तसेच मूळ फिर्यादीतर्फे डी. बी. आर. भिलारे यांनी काम पाहिले.कोर्ट पैरवी म्हणून पो.कॉं.आर.एस.काशीद ,एस.ए.घाडगे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)