पाचवड येथे 10 लाखाच्या जुन्या नोटा जप्त

भुईंज पोलिसांची कारवाई, एकजण ताब्यात
भुईंज, दि. 28 (प्रतिनिधी) –
चलनात नसलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या 9 लाख 97 हजाराच्या नोटा घेऊन निघालेल्या एका एजंटाला भुईंज पोलिसांनी सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. बाजीराव अण्णा मोरे (रा. राणगेघर, ता. जावली) असे संबंधिताचे नाव असून त्याच्याविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणगेघर येथील वेल्डींग दुकानदार बाजीराव अण्णा मोरे (वय 55) हे चलनात नसलेल्या नोटा घेऊन पाचवड येथे येणार असल्याची माहिती भुईंज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाचवड येथे सापळा लावला होता. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बाजीराव अण्णा मोरे हे आपल्या दुचाकीवरुन पाचवड येथील बाजार समितीच्या आवारात दाखल झाले. आणि नोटा बदलून देणाऱ्या इसमाची वाट पाहू लागले. बराच वेळ झाला तरी नोटा बदलून देणारा माणूस दिसत नसल्याने ते त्याला परिसरातच इतरत्र शोधण्यासाठी दुचाकीवरुन फिरत होते. यादरम्यान पोलिसांनी मोरे यांना अडवून त्यांच्याकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली. अचानक पोलिसांना बघून बाजीराव मोरे गांगरुन गेले. पोलिसांनी मोरे यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ चलन नसणाऱ्या हजार आणि पाचशे रुपयांनी भरलेली एक बॅग सापडली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मोरे यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन भुईंज पोलीस ठाण्यात आणून मोरे यांच्याजवळील नोटा मोजल्या असता त्यात एक हजाराच्या 587 तर पाचशे रुपयांच्या 800 नोटा आढळून आल्या. पोलिसांनी मोरे यांना चलनात नसलेल्या नोटा बाळगल्याप्रकरणी अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मोरे यांच्याव जवळ असलेल्या 9 लाख 97 हजाराच्या चलनात नसलेल्या नोटांसह पन्नास हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली आहे. अधिक तपास सपोनि बाळासाहेब भरणे करत आहेत.
सहाय्याक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय साळी, पोलीस नाईक बापूराव धायगुडे, जितू शिंदे, प्रशांत दुदुस्कर, ससाणे, कांबळे यांनी ही कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)