पाकिस्तान बरोबर संयुक्त लष्करी कवायती का ?

कॉंग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल
नवी दिल्ली – शांघाय कोऑपरेशन अंतर्गत गेल्या आठवड्यात रशियात झालेल्या संयुक्त लष्करी कवायतीत भारताने पाकिस्तानबरोबर सहभाग घेतला आहे त्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ज्या देशाने आपल्या देशातील हजारो नागरीकांचे दहशतवादी कारवायांद्वारे बळी घेतले आहेत त्या देशाशी मिळून तुम्ही संयुक्त लष्करी सराव करता हे योग्य आहे काय असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

कॉंग्रेसचे एक मंत्री नवज्योत सिद्धु हे अलिकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला गेले होते तसेच त्यांनी त्यावेळी तेथे पाकिस्तानी लष्कर प्रमुखांची गळाभेट घेतली होती त्यावरून भाजपने कॉंग्रेस व सिद्धु यांच्या विरोधात टीकेचे काहुर माजवले होते या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसनेही आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संयुक्त लष्करी कवायतीबाबत मोदी सरकारवर ही टीका करण्याची संधी साधली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदी सरकारने सन 2016 साली पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्याची पहाणी करण्यासाठी थेट आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेलाच निमंत्रण दिले होते त्याचीही आठवण करून देत कॉंग्रेस प्रवक्‍त्याने मोदी सरकारवर हल्लबोल केला आहे. तुम्ही प्रथम आयएसआयच्या प्रतिनिधींनाच भारतात निमंत्रण दिले आणि आता पाकिस्तान बरोबर संयुक्त लष्करी कवायतही सुरू केली आहे. भारतात दहशतवादी कारवाया करून हजारो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पाकिस्तानबरोबर तुम्ही ही सलगी का दाखवत आहात असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)