पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्युज पुन्हा ऑन एअर…

इस्लामाबाद : पाकिस्तानची वृत्तवाहिनी जिओ न्युजवरील बंदी पाक सरकारने हटवली आहे. त्यामुळे ही वाहिनी पुन्हा एकदा ऑन एअर झाली आहे. मात्र या वाहिनीला ऑन एअर होण्यासाठी पाकिस्तानी लष्करासोबत करार करावा लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. या करारानुसार जिओ वाहिनीला आपल्या प्रसारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करावे लागणार असल्याचेही म्हटले जात आहे.

पाकिस्तानच्या लष्कराविषयी मागील वर्षी मार्च महिन्यात जिओ वाहिनीने काही वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर या वाहिनीच्या सर्वच प्रसारणावर पाक प्रशासनाने बंदी घातली होती. दरम्यान, आता ही बंदी उठवण्यात आली असली तरी वाहिनीवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला असून यापुढे पाकच्या लष्कर आणि राजकारणाच्या बातम्या एका वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात यावे असा करार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि इथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता मात्र तरीही काहीदिवस या दबावाला न जुमानता वाहिनी आपले काम करत होती. शेवटी सरकारने या वाहिनीच्या प्रसारणावर बंदी आणली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)