पाकिस्तानी परराष्टमंत्रीच्या भाषणापूर्वी सुषमा स्वराजने सोडली परिषद…

नवी दिल्ली- अमेरिकेतील  न्यूयॉर्कमध्ये सार्क परिषदेच्या बैठकीत भरात आणि पाकिस्तान यांच्यामाधे तणावाचे वत्तावारण दिसून आले. भरात- पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी याचे भाषण देखील ऐकले नाही.

सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणावेळी दहशतवाद संपवण्यासाठी सर्वानी मिळून प्रयन्त आणि सहकार्य करण्याचे बोलले होते. त्या म्हणाल्या होत्या की, आपल्या परिसरातील लोकांना आर्थिक विकास, प्रगती आणि शांती चे वातावरण खूप गरजेचे आहे. आपल्या क्षेत्रात आणि जगभरात शांती आणि स्थिरतेला दहशतवादपासून धोका आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुषमा स्वराज याचे वेळापत्रक खुप व्यस्त होते. त्यामुळे त्या तेथे थांबू शकल्या नाहीत. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री याचे भाषण होण्याच्या  अगोदर त्या परिषदेतून निघून गेल्या. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी म्हणाले की, सार्कच्या प्रगतीमध्ये जर कोणता देश अडथळा निर्माण करत आहे तर तो एक देश आहे.  भारत क्षेत्रीय सहयोगा विषयी बोलतो परंतु हे कसे संभव आहे जर सगळे बसून दुसऱ्याचे म्हणणे ऐकत असेल आणि तुम्ही जर त्याला ब्लॉक करत असाल.

https://twitter.com/ANI/status/1045397796193333248

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)