पाकिस्तानी आगळिकींमध्ये चार वर्षांत सहापट वाढ

नवी दिल्ली – पाकिस्तानी सैनिक वारंवार शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय हद्दीत मारा करतात. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीमुळे पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत होणाऱ्या अशाप्रकारच्या आगळिकींमध्ये चार वर्षांत तब्बल सहा पट वाढ झाल्याचे समोर आले.

संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज राज्यसभेत पाकिस्तानच्या कुरापतींची माहिती दिली. पाकिस्तानी सैनिकांनी 2015 मध्ये 152 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला. पुढील दोन वर्षांत अशाप्रकारच्या 228 आणि 860 घटना घडल्या. चालू वर्षात 23 जुलैपर्यंत शस्त्रसंधी भंगाच्या 942 घटना घडल्या. पाकिस्तानी सैनिकांकडूून आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत असणाऱ्या भारतीय हद्दीतही मारा केला जातो. त्या घटनांमध्येही चार वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयबीलगत 2015 मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी 253 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला. चालू वर्षात अशाप्रकारच्या 490 घटना घडल्या. पाकिस्तानी माऱ्यात चार वर्षांमध्ये भारतीय लष्कराचे 44 तर भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) 25 जवान शहीद झाले. चार वर्षांत पाकिस्तानी सैनिकांच्या नापाक माऱ्यामध्ये 69 भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)