पाकिस्तानात मतदानाच्यावेळी मोठा हिंसाचार

क्वेट्टा शहरांतील बॉंब स्फोटात 31 ठार
कराची – पाकिस्तानी संसदेच्या निवडणुकीसाठी आज देशभर विविध ठिकाणी मतदान घेण्यात आले. त्यावेळी ठिकठिकाणी हिंसांचाराच्या मोठ्या घटना घडल्या. क्वेट्टा शहरात एका मतदान केंद्राच्या बाहेर करण्यात आलेल्या आत्मघाती बॉंम्ब स्फोटात किमान 31 जण ठार तर अन्य 36 जण जखमी झाले आहेत. क्वेट्टा ही बलुचिस्तान प्रांताची राजधानी आहे.

या आत्मघाती हल्ल्याच्या संबंधात माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की शहराच्या पुर्वेकडील बायपास जवळ हा स्फोट झाला. मतदान केंद्राच्या जवळ हा स्फोट झाला असला तरी हल्लेखोरांचे उद्दीष्ठ मतदान प्रक्रिया रोखणे हे नव्हते तर त्यांनी तेथे पोलिस दलाच्या एका व्हॅनला लक्ष्य करून हा स्फोट घडवला.आत्मघाती पथकातील या हल्लेखोराला मतदान केंद्रात घुसायचे होते पण त्याला तेथे अडवले गेल्याने त्याने बाहेर जाऊन पोलिसांच्या व्हॅनला लक्ष करीत स्वत:ला उडवून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही व्हॅन डीआयजी अब्दुल रज्जाक चिमा यांची होंती. पण ते स्वत: सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. देशात अन्यत्र मतदानाच्यावेळी परस्पर विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्येही मोठ्या चकमकी झाल्याचे बातम्या हाती येत आहेत. मीरपुरखा, नवान कली इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकीत दोन जण ठार झाल्याचे वृत्त आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)