पाकिस्तानात बस अपघातात 26 ठार

पेशावर: डोंगराला प्रवासी बस धडकून झालेल्या अपघातामध्ये पाकिस्तानात किमान 26 जण ठार झाले. त्यामध्ये 13 लहान मुलांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्‍त अन्य 13 जण ठार झाले आहेत. रविवारी पाकिस्तानच्या वायव्येकडील डोंगराळ रस्त्यावरुन वळण घेत चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला.

गिलगिट-बाल्टिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताला लागून असलेल्या बाबुसर टॉप भागात हा अपघात झाला. बस स्कर्दू शहरातून रावळपिंडीकडे जात होती आणि त्या बसमध्ये पाकिस्तानच्या लष्कराच्या 16 जवानांसह 40 प्रवासी होते. अपघातग्रस्त बसमधून महिला व मुलांसह 26 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे गिलगिट- बाल्टिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते रशीद अर्शद यांनी सांगितले. वळण घेत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती एका डोंगराला धडकली. ड्रायव्हरने वाहनवरील नियंत्रण कसे गमावले हे अद्याप समजू शकलेले नाही,

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×