पाकिस्तानातील बॉंम्बस्फोटात 16 ठार

कराची – पाकिस्तानातील बॉंबस्फोटात आज सोळा जण ठार झाले तर 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट क्वेट्टा शहरात आज सकाळी झाला. शहराच्या भाजी मंडईच्या गजबजलेल्या भागात हा स्फोट झाल्याने मृतांचा आकडा मोठा आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. आयईडी स्फोटकांच्या सहाय्याने हा स्फोट घडवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहराच्या हजरगंजी भागात हा स्फोट झाल्याने त्यात ठार झालेले बहुतेक जण हे हाजरा समुदायाचे लोक आहेत. कोणत्याही संघटनेने अद्याप या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. पाकिस्तानात हाजरा हा समुदाय अल्पसंख्य आहे. त्यांच्यावरील या हल्ल्याचा पंतप्रधान इम्रान खान यांनी निषेध व्यक्त केला असून याला जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.