पाकिस्तानवाली गली : ‘प्लीज आमच्या कॉलनीचे नाव बदला’

ग्रेटर नोएडामधील रहिवाशांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडामधील एका कॉलनीच्या रहिवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आपल्या कॉलनीचे नाव बदलण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानवाली गली असे या कॉलनीचे नाव असून इथल्या रहिवाशांना सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच रहिवाशांनी हे नाव बदलण्याची विनंती केली आहे.

नोएडामधील या कॉलनीतील रहिवाशांचे पुर्वज फाळणीच्यावेळी इथे येऊन राहिले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत या कॉलनीचे नाव पाकिस्तानवाली गली असे पडले आहे. दरम्यान, इथल्या रहिवाशांनी आपण भारतीय असून आपले चार पुर्वज इथे राहिले पाकिस्तानमधून इथे राहण्यास आले होते बाकीचे सर्वजण भारतीय आहेत परंतु, आमच्या आधार कार्डवर आजही पाकिस्तानवाली गली असेच लिहिले गेले आहे. त्यामुळे आम्हाला सरकारी योजनांपासून दुर राहण्याची वेळ आली असल्याचे इथल्या नागरिकांनी पत्रात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.