पाकिस्तानला लवकरच चोख प्रत्युत्तर – बीएसएफ

नवी दिल्ली – पाकिस्तानी सैनिकांनी काही दिवसांपूर्वी भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाची गळा चिरून निर्घूण हत्या केली. त्या नापाक कृत्याबद्दल लवकरच चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार बीएसएफने बोलून दाखवला आहे.

बीएसएफचे मावळते महासंचालक के.के.शर्मा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना जवानाच्या हत्येचा बदला घेण्याचे सूतोवाच केले. शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी बीएसएफचे जवान योग्य वेळेच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी म्हटले. पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्‍शन टीमच्या (बॅट) सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत ते नापाक कृत्य केले. आयबीलगत बॅटने प्रथमच तसे कृत्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता योग्यवेळी आणि आम्ही निवडलेल्या जागी प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला आहे, असे शर्मा म्हणाले. पाकिस्तानात नेतृत्वबदल झाल्यानंतर त्या देशाने आणखी आक्रमक धोरण स्वीकारल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनल्यानंतर सीमेवरील स्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. इम्रान पंतप्रधान बनल्यानंतरच आपल्या जवानाच्या हत्येची घटना घडली. आयबीलगत तसे कधीच घडले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)