पाकिस्तानमध्ये सत्ताबदल; इम्रान खान यांचा पीटीआय सर्वांत मोठा पक्ष

इस्लामाबाद – सार्वत्रिक निवडणुकीमुळे पाकिस्तानात सत्ताबदल निश्‍चित झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे इम्रान यांच्या रूपाने त्या देशाला नवा पंतप्रधान लाभणार आहे. दरम्यान, पिछाडीवर पडलेल्या प्रमुख पक्षांनी मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत प्रचंड गैरप्रकार घडल्याचा आरोप केला आहे.

पीटीआयने प्रतिस्पर्धी पक्षांना बरेच मागे टाकत 76 संसदीय जागा जिंकल्या. तो पक्ष आणखी 43 जागांवर आघाडीवर आहे. तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) पक्ष दुसऱ्या स्थानावर राहिला. त्या पक्षाने 43 जागा जिंकल्या. पीएमएल-एन 20 जागांवर आघाडीवर आहे. तर पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) तिसऱ्या स्थानी फेकली गेली. पीपीपीने 18 जागा जिंकल्या. तो पक्ष आणखी 19 जागांवर आघाडीवर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या जागा पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या नॅशनल असेंब्लीच्या आहेत. त्या सभागृहाचे एकूण संख्याबळ 342 आहे. मात्र, त्यातील 242 जागाच जनतेमधून निवडूून दिल्या जातात. त्यामुळे पाकिस्तानात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा 137 हा जादुई आकडा गाठावा लागतो. त्या आकड्याच्या बराच जवळ इम्रान यांचा पक्ष पोहचला आहे. इतर छोटे पक्ष किंवा अपक्षांच्या मदतीने तो पक्ष सरकार स्थापन करू शकतो. दरम्यान, नॅशनल असेंब्लीच्या उर्वरित 70 जागा महिला आणि धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत. त्या नंतर राजकीय पक्षांच्या संख्याबळाच्या प्रमाणानुसार भरल्या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)