पाकिस्तानमधील निवडणूकीच्या न्यायालयीन चौकशी करावी

नवाझ शरीफ यांच्या पक्षाची मागणी

लाहोर – पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडडणूकीतील गैरव्यवहारांची नियुक्‍ती करण्यासाठी न्यायालयीन आयोगाची नियुक्‍ती करण्यात यावी, अशी मागणी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाने केली आहे. या निवडणूकीतील मतदानाच्या दिवशी झालेल्या गैरव्यवहारांच्या पुराव्यांबाबत श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध केली जाईल आणि या गैरव्यवहारांची चौकशी करणाऱ्या न्यायालयीन आयोगापुढेही सादर केली जाईल, असे पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गटाचे नेते ख्वाजा आसिफ, अहसान इक्‍बाल आणि खासदार उशाहिदुल्लाह खान यांनी पत्रकार परिषदेत या निवडणूकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

तर सिंध प्रांतातील निवडणूकांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रांतातील निवडणूक आयुक्‍तांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. मतपत्रिकांची पाच रिकामी खोकी कराची आणि सियालकोटमध्ये रस्त्याच्या कडेला पडलेली आढळून आली होती.

माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक इन्साफ (पीटीआय) पक्षाला निवडणूकीत सर्वाधिक 116 जागा मिळाल्या आहेत. मात्र तरिही स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करायला बहुमतासाठी अजूनही काही जागा त्यांना कमी पडत आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ गटाला 64 तर माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 43 जागा मिळाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)