पाकिस्तानमधील निवडणुकीच्या नि:पक्षपातीपणाबाबत अमेरिकेचे प्रश्‍नचिन्ह

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या नि:पक्षपातीपणाबाबत अमेरिकेने प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. या निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाला लष्कराचे समर्थन मिळाले, तर पीएमएल-एन (पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज) आणि पीपीपी (पाकिस्तान पीपल्स पार्टी) या दोन पक्षांना बंदिस्तपणात प्रचार करावा लागला.

पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानमधील निवडणुका निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे झाल्याचे घोषित करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणांसाठी अमेरिकेने निवडणुकांसाठी आपले निरीक्षक पाठवले नव्हते.
पाकिस्तानमधील निवडणुकीचे निकाल हे पूर्वनियोजित होते असे अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत असंणाऱ्या हुसेन हक्कानी यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणुकीच्या निकालांनी पाकिस्तानमध्ये काहीही बदलणार नाही, असे हडसन इन्स्टिट्यूट थिंक टॅंकशी संबंधित हक्कानी यांनी म्हटले आहे. लष्कराचे समर्थन असणारी सरकारे जिहादी कारवाया बंद करत नाहीत, आणि दहशतवाद हा पाकिस्तानसाठीच धोका असल्याचे मान्य करत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानात काहीही बदलणार नाही, इम्रान खानची दहशतवादाला असलेली सहानुभूती पाहता पंतप्रधान म्हणून दहशतवाद्यांच्या विरोधात तो काही कारवाई करील असे वाटत नसल्याचे असे हक्कानी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)