पाकिस्तानच्या संघाने आत्मविश्‍वास गमावला आहे – मिकी आर्थर

दुबई: पाकिस्तान क्रिकेट संघात आत्मविश्वासाची पोकळी निर्माण झाली आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून चार दिवसांत दोन पराभव पत्करावे लागल्यानंतर पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांच्याकडून सध्याच्या पाकिस्तान संघाच्या मानसिकतेबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रविवारी पार पडलेल्या आशिया चषक “सुपर फोर’ लढतीत भारताने पाकिस्तानवर नऊ विकेट्‌स राखून मात केली. हे अपयश म्हणजे पाकिस्तानच्या सुमार कामगिरीपैकी आहे, असा शेराही प्रशिक्षक ऑर्थर यांनी दिला आहे.

या संघाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, पण सध्या या संघातील खेळाडूंमध्ये सध्या तरी आत्मविश्‍वासाची कमतरता दिसून येते आहे. ड्रेसिंगरूममध्येही या क्षणी पराभवाची भीती पसरली आहे, असे ऑर्थर म्हणाले आहेत. पाकिस्तानला रविवारी भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑर्थर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या गोष्टी उघड केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मी भारताविरुद्धच्या या पराभवाला सुमार कामगिरी म्हणतो आहे, कारण टीम इंडिया नऊ विकेट्‌स राखून जिंकली आहे. भारतीय संघात दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे, अशा संघाला थोडीशी संधी किंवा मोकळीक दिली तर ते डोईजड होऊ शकतात. याचा प्रत्यय दोनदा आला आहे. रविवारीदेखील पाकिस्तानला लढतीवर पकड घेण्याच्या दोन, तीन संधी लाभल्या. पण त्यांचा फायदा उठवणे आम्हाला जमले नाही. दुबई स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंना जीवदान दिले, तर ते त्या संधीचा दुप्पट फायदा उठवल्याशिवाय राहणार नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)