पाकिस्तानच्या निवडणुकीत झाली बनवेगीरी

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा आरोप
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बनवेगीरी झाली असून या संशयास्पद निवडणूक पद्धतीमुळे देशाच्या राजकारणावर विपरीत परिणाम होणार असल्याची टीका पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे. अदियाला येथील कारागृहातून त्यांनी निवडणूक विषयक ही प्रतिक्रीया दिली आहे.

रावळपिंडी, लाहोर, फैसलाबाद येथील निवडणुकीचे निकाल संशयादस्पद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या मतदार संघातील आपल्या पक्षाचे उमेदवार अत्यंत प्रबळ होते पण त्यांना पराभूत म्हणून घोषित करण्यात आले आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की खैबर पख्तुनवा प्रांतात इम्रान खान यांच्या पक्षाच्या सरकारची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची आहे पण तेथेही त्यांच्या पक्षाला विजयी घोषित करण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या पक्षाची आजच्या निवडणुकीतील स्थिती ही सन 2013 च्या निवडणुकीपेक्षाही कमजोर होती, पण तरीही त्यांच्या पक्षाने तेथे जो विजय मिळवला आहे त्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही.

या निवडणुकीत बनवेगीरी झाली आहे त्यातून पाकिस्तानचे राजकारण खराब होणार आहे अशी प्रतिक्रीयाही त्यांनी दिली आहे. या निवडणूकीत शरीफ यांच्या पीएमएल पक्षाचे नेतृत्व शरीफ यांचे बंधु शाहाबाज शरीफ यांनी केले होते व तेच पाकिस्तानचे पंतप्रधान होतील असा अंदाज बहुतेकांनी व्यक्त केला होता. दरम्यान शरीफ यांची प्रकृती बरीच ढासळली असून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी कारागृह प्रमुखांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)