पाकिस्तानचा 5 अब्ज रुपयांचा चेक बाऊन्स – सीपीईसी चे काम बंद

पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानचा 5 अब्ज रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याने अनेक ठेकेदारांनी सीपीईसी योजनेचे काम बंद ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेचे परिणाम आता 52 अब्ज डॉलर्सच्या सीपीईसी (चीन पाकिस्तान इक़ॉनॉमिक कॉरिडॉर) योजनेवर होऊ लागले आहे.

आर्थिक संकटामुळे प्रभावित झालेल्या परियोजनेत सीपीईसीचा हक्‍ला-डेरा इस्माईल मार्ग आणि कराची-लाहोर मोटरवे चा समावेश आहे. ठेकेदार कंपन्यांना ऑथॉरिटीने 29 जून रोजी 5 कोटी रुपयांचा चेक दिला होता. दीड कोटी रुपयांचा चेक त्याच दिवशी क्‍लियर झाला मात्र दुसऱ्या दिवशी जमा केलेले चेक बाऊन्स झाले, असे या बाबत तपास केला असता सांगण्यात आले. सीपीईसी योजना डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असले, तरी बिले चुकवण्यात होणाऱ्या उशिरामुळे सीपीईसीच्या अनेक योजना वेळेवर पूर्ण होणार नाहीत असे दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीपीईसी योजना बीआरआय (बेल्ट अँडस्‌ रोड इनिशिएटिव्ह)ची मुख्य योजना आहे. बीआरआय योजनेने चीनचा शिनजियांग प्रांत पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला जोडणार आहे. त्यामुळे चीनचा शिरकाव सरळ अरबी सागरात होणार आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात असल्याने सीपीईसीला भारत्ताचा विरोध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)