पांढरस्थळ येथे हातभट्टीवर छापा; 53 हजारांचा मुद्देमाल नष्ट

लोणी काळभोर- पांढरस्थळ, उरुळी कांचन येथे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या ठिकाणावर छापा टाकून पोलिसांनी 53 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला असून आरोपी मात्र फरार झाला आहे.
राजु गोयल (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अमोल मारुती भोसले या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक निरीक्षक चेतन थोरबोले, हवालदार सोमनाथ चितारे, रुपेश भगत, प्रमोद शिंदे या पोलीस पथकाने ही कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच गावठी हातभट्टी दारू बनवणारा राजु पळून गेला. पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 50 हजार रुपये किमतीचे पाच हजार लिटर कच्चे रसायन व दोन प्लॅस्टिक कॅन भरून दारू असा एकूण 53 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)