पांडेश्वर भागशाळेतील मुलींना सायकलीचे वाटप

जवळार्जून- पवार चॅरिटेबल ट्रस्ट व टाटा ट्रस्ट यांच्या वतीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या यशवंत विद्यालयाची भागशाळा पांडेश्वर विद्यालयामधील 22 विद्यार्थींनीना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कडेपठार बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना 300 वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात सुदाम इंगळे, सुधाकर टेकवडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, सरपंच वैयाजंता प्रकाश शिंदे, कडेपठार पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक अरविंद शेंडकर, संजय जगताप, अशोक नाळे, विट्ठल रोमन, प्रताप रासकर, माणिक नाळे, बंडू नाळे, हनुमंत रोमन, पुष्पावती देशमुख, रणजित खारतोडे, प्रशांत माकर, मेघमाला सकुंडे, मोहिनी कापरे, माधुरी दळवी, संजवनी निंबाळकर, सोनाली काळाने, प्रताप विरकर, बाळासाहेब मेमाणे, सागर शितोळे, रामचंद्र जाधव व गणेश सोनवणे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)