पांगारी आश्रमशाळेची कमान धोकादायक

भाटघर- भाटघर धरणाच्या दक्षिण बाजूस पांगारी गावातील आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इमारत भक्कमपणे उभी असली तरी इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या वरच्या भागाला आडवे तडे गेले आहेत. यामुळे प्रवेशद्वार कमानीचा वरील भाग कधीही कोसळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
पांगारी येथे आश्रमशाळेची दोन मजली इमारत निर्माण करण्यात आली आहे. सध्या या इमारतीत पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.

सव्वाचार कोटी रुपये खर्च करून इमारतीचे निर्माण केले आहे, परंतु प्रवेशद्वाराच्या कमानीच्या वरच्या भागाला तडे गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आश्रमशाळेतील मुले याच कमानी पासून ये-जा करीत असतात. यामुळे आश्रमशाळेतील मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पालकांनी लवकरात लवकर कमानीची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.