पहिल्या तिमाहीत एसकेएफची विक्री वाढली 

मुंबई -बेअरिंग्ज आणि सर्व्हिसेस कंपनीने पहिल्या तिमाहीमध्ये 7549.5 दशलक्ष रुपयांची विक्री केली. मागील वर्षी याच तिमाहीत ही विक्री 7208.8 दशलक्ष रुपये इतकी होती. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीअखेरची विक्री ही मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 13.3 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. पहिल्या तिमाहीअखेर करपश्‍चात नफा 808.6 दशलक्ष रुपये झाला असून मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत (642.7 दशलक्ष) त्यामध्ये 25.8 टक्‍के वाढ निदर्शनास आलेली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑरस्टाडीयस म्हणाले, आमच्या ऑटोमोटीव्ह आणि इंडस्ट्रीयल अशा दोन्ही व्यवसायांत मिळालेल्या उत्तम मागणीच्या आधारे आम्ही या वर्षाची सुरुवात अतिशय चांगली केली आहे. चांगल्या मान्सूनचे संकेत आणि 2018-19 मधील सुधारलेली अर्थव्यवस्था यामुळे आम्ही आशावादी झालो आहोत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)