पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्कुल बस चालकाला सक्तमजुरी

पुणे- वारजे येथील नामांकित इग्रजीमाध्यमाच्या शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या शाळेच्या बस चालकाला दहा वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायलयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.
संदीप शिवाजी कुंभार (30, रा. कामठे वस्ती, शिवणे) असे शिक्षा झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत सहा वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर 2014 ते 13 नोव्हेंबर 2014 दरम्यान आरोपी चालवत असलेल्या शाळेच्या बसमध्ये घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. स्मिता देशमुख यांनी सहकार्य केले.
फिर्यादींना यांना दोन मुली आहेत. त्यांची सहा वर्षाची मोठी मुलगी वारजे येथील नामांकीत इग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना शाळेच्या बसवर असलेला चालका संदीप कुंभार इतर मुलांना मुलींना बसमधून उतरविल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलीला त्रास होत असल्याने तिच्या आईने तिला विचारल्यानंतर तिने आरोपीच्या वाईट कृत्याबद्दल सांगितले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन, आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यात सरकारी वकील सुनील मोरे यांनी आठ साक्षीदार तपासताना नराधम आरोपी कुंभारला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची मानताना दहा वर्ष सक्तमजुरी सुनावली. गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल नाईक यांनी केला.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)