पहिला दिवस शांततेत!

इयत्ता 12 वी ची परीक्षा : 27 परीक्षा केंद्रावर 21 हजार परीक्षार्थी

पिंपरी – राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या परीक्षेला आज शहरातील शहरातील 27 परीक्षाकेंद्रावर शांततेत सुरवात झाली. विद्यार्थ्यांचा आज पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर होता. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता मोठ्या उत्साहात विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेल्याचे दिसून आले. यावर्षी 12 वीच्या परीक्षेसाठी 21 हजार 142 विद्यार्थी बसलेले असून, 20 मार्च पर्यंत 12 वीच्या परीक्षा होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 21 हजार 142 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत. आज दि. 21 फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपरपासून परीक्षेला सुरवात झाली. सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी व पालकांची परीक्षाकेंद्राबाहेर गर्दी झाली होती. सकाळी 11 वाजल्यापासून परिक्षेला सुरवात झाली. यावेळी सर्वच परीक्षा केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

परीक्षा केंद्रामध्ये सकाळी 10 वाजुन 15 मिनीटानी विद्यार्थ्यांची झाडाझडती व तपासणी करुन विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रामध्ये सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी 10 वाजून 40 मिनिटांला विद्यार्थ्यांच्या हातात उत्तरपत्रिका देण्यात आली. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले नाव, बैठक क्रमांक टाकून बारकोड चिटकवल्यानंतर 10 वाजुन 50 मिनीटाला विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्‍नपत्रीका देण्यात आल्या. व सकाळी 11 वाजता पेपर लिहण्यास विद्यार्थ्यांनी सुरवात केली. शहरातील सर्वच परीक्षाकेंद्रावर खबरदारी म्हणून पोलिसबंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज पहिला पेपर सर्वच परीक्षा कंद्रावर शांततेत पार पडला.

भरारी पथकाकडून तपासणी
शहरातील 27 परीक्षा केंद्रावर आज 12 वीच्या परीक्षेला सुरवात झाली. परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी शिक्षण विभागने भरारी पथकांची नेमणूक केली असून, आज परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी भरारी पथकाने अचानक भेट देवून विद्यार्थ्यांची तपासणी केली आहे. आता परीक्षा संपेपर्यंत या भरारी पथकाडून परीक्षाकेंद्राला भेट देवून तपासणी करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

आज 12 वीच्या परीक्षेला सुरवात झाल्यानंतर शहरातील काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देते वेळी संमधीत केंद्रप्रमुखांकडुन गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्रप्रमुखांनी केलेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षाला समोरे जाताना आत्मविश्‍वास आणखी वाढल्याचे दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.