पहा, आलिया रणवीरच्या नात्यावर काय म्हणतेय करिना…

मुंबई – मागील काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची चर्चा बॉलिवूडमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या लग्नाच्याही चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. तसंच, वेगवेगळ्या कार्यक्रमात दोघेही सोबतच हजेरी लावतात. अशातच करिना कपूर खान हिनेही त्यांच्या नात्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, अलिकडेच करिनाने आलिया भट्ट सोबत ‘मामी मुव्ही मेला’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान करिनाला रणबीर आणि आलियाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, की ‘मी खूप भाग्यशाली असेल, आलिया माझी वहिनी झाली तर’. यावर आलियानेही म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, मी अजून याबाबत विचार केला नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व गोष्टी पार पडतील’.

करिना आणि आलियाच्या या उत्तरामुळे पुन्हा आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चांना हवा मिळाली आहे.वर्कफ्रंटबाबत सांगायंच तर, करिना आणि आलिया दोघीही करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटात झळकणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.