पश्‍चिम बंगालमध्ये स्थानिक भाजप नेत्याची हत्या

डायमंड हार्बर – पश्‍चिम बंगाल मधील 24 परगणा जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेते शक्तीपद सरदार यांची मंदिर बझार भागात काहीं अज्ञात इसमांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ते भाजपच्या मंदिर बजार मंडलाचे सेक्रेटरी म्हणून काम पहात होते.

रात्री काही इसमांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना ठार मारले. ते रस्त्यावर रक्‍त्याच्या थारोळ्यात पडले असल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले परंतु त्यांची प्रकृती जास्तच गंभीर झाल्यानंतर त्यांना कोलकाता येथे हलवले जात असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्यांनीच ही हत्या घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे पण तृणमुल कॉंग्रेसने त्याचा इन्कार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)