“पश्‍चिम बंगाल’च्या ऐवजी केवळ “बांगला’

पश्‍चिम बंगालच्या विधानसभेत ठराव मंजूर

कोलकाता – पश्‍चिम बंगाल राज्याचे नाव बदलून केवळ “बांगला’ करण्यात यावे, असा ठराव पश्‍चिम बंगालच्या विधानसभेमध्ये करण्यात आला. या ठरावाला केंद्रीय मंत्री मंडळाने मंजूरी देण्यासाठी तो केंद्राकडे पाठवून देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अद्याक्षरांच्या क्रमानुसार पश्‍चिम बंगाल (वेस्ट बंगाल) हा राज्यांच्या यादीमध्ये शेवटी येत असे. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच राज्याचे नाव बदलण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी केंद्राकडे तसा प्रस्तावही पाठवला होता. बंगालीमध्ये बांगला, हिंदीमध्ये बंगाल आणि आणि इंग्रजीमध्ये बेंगॉल असे नामकरण करण्यात यावे असा त्यांचा प्रस्ताव होता. मात्र केंद्र सरकारने त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. त्यापूर्वी 2011 मध्येही पश्‍चिम बंगालचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ममता बॅनर्जींनी केला होता. त्यावेळी पश्‍चिम बंगालचे नाव “पस्चिम बंगो’ असे करण्याचा प्रस्तावही केंद्राने नाकारला होता. झालेल्या ठरावानुसार राज्याचे नाव केवळ “बांगला’ असेच असेल. बंगाली, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये हे नाव असेच असणार आहे.

राज्याचे नाव बदलण्याच्या मुद्दयावर विधानसभेमध्ये अनेकवेळा सविस्तर चर्चा झाली आहे. आता आपण स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांना याबाबत विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच राज्याला तीन वेगवेगळी नावे असू शकत नाहीत. म्हणून एकाच नावाचा प्रस्ताव यावेळी दिला गेल्याचेही त्यांनी सांगितले.

बंगाली या आपल्या मातृभाषेतूनच राज्याचे नाव असायला हवे, यासाठी आपण एकच नाव निवडले आहे. बंगाली ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी पाचवी भाषा आहे. त्यामुळे त्यातूनच राज्याची ओळख असायला हवी असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)