पवार महाविद्यालयत वृक्ष देऊन गुजनांचा सन्मान

पिरंगुट- येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयातील गुरुजनांचा सन्मान सोहळा पार पडला. पिरंगुटचे माजी आदर्श सरपंच व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाळासाहेब गोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात वृक्ष आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी गुरुजनांना सन्मानित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रोहिणी सुतार, चैतन्या बलकवडे, तेजल साठे, सारिका मरगळे, प्रवीण मसुरकर, रोहित ओव्हाळ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दिपाली साठे तर रोहिणी सुतार हिने आभार मानले.
पिरंगुट इंग्लिश स्कुलमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला. यावेळी प्राचार्य डॉ. गौतम पिसे, पर्यवेक्षक कृष्णा देशमुख, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. गौतम पिसे म्हणाले, आई-वडील हे आद्य गुरू आहेत. त्यानंतर शिक्षक हे विद्यार्थ्यांचे गुरू आहेत. नेहमी गुरुं बद्दल आदर ठेवला पाहिजे. विद्यार्थिनी सोनाली दोडके हिने आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)