पवार नगरला मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी – पतीसोबत रस्त्याने चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकवले. ही घटना सोमवारी (दि. 4) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पाटील नगर, बावधन येथे घडली. सुनीता मधुकर जोशी (वय-65, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनीता त्यांच्या पती सोबत पवार नगर येथे चालत जात होत्या. रॉयल इनफिल्ड बुलेट सर्व्हिस सेंटर समोर त्या आल्या असता एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुचाकी सुनीता आणि त्यांच्या पतीच्या मध्ये घातली आणि जबरदस्तीने सुनीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)