पवार कुटुंबीयांनी जपले जुने ऋणानुंबध

चिंबळी- शरद पवारांचे जुने ऋणानुबंध जपण्याचे सूत्र पवार कुटुंबीयांनी देखील जपले असल्याचे सोमवारी (दि. 28) पुन्हा एकदा दिसून आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या संस्थापिका सुनेत्रा पवार यांनी येथील जुन्या पिढीतील माजी सरपंच रामचंद्र कातोरे, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांच्याशी पवार घराण्याशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ करीत त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्नेहभोजनासह जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यांच्या समवेत बाळासाहेब बराटे, लक्ष्मण कातोरे कुटुंबातील हनुमंत कातोरे, संतोष कातोरे, अनिल कातोरे, विशाल तापकीर, ऍड. अभिजीत जाधव, ज्ञानेश्‍वर कड, आदी उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी कातोरे कुटुंबियांशी संवाद साधत रामचंद्र कातोरे यांच्याकडून खेड तालुक्‍यातील राष्ट्रवदीची व शरद पवारांच्या राजकीयसह सामाजिक कार्याची माहिती माहिती घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)