पवना बंदिस्त जल वाहिनीला विरोध कायम

पवना नगर : पवना धरणाचे जल पूजन करताना पंचायत समिती सदस्या निकीता घोटकुले, जिजाबाई पोटफोडे व आमदार बाळा भेगडे व अन्य पदाधिकारी.
  • बाळा भेगडे यांचे स्पष्टीकरण : पवना धरणात जल पूजन

पवनानगर – पवना बंदिस्त जल वाहिनीला कालही विरोध होता, आजही आहे आणि उद्याही तो कायम राहणार असल्याचे मत मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी पवना नगर येथे व्यक्‍त केले.

पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण मावळची तहान भागवणारे पवना धरण परिसरात या महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे पवना धरण 95 टक्‍के भरले आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी पवना धरणात जल पूजन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी आमदार बाळा भेगडे, मावळचे सभापती गुलाब म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, उप विभागीय अभियंता एन. एम. मठकरी, पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल, माजी सभापती एकनाथ टिळे, ज्ञानेश्‍वर दळवी, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले, पंचायत समिती सदस्या जिजाबाई पोटफोडे, निकीता घोटकुले, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, भाजपाचे अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, कार्याध्यक्ष अजित आगळे व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार भेगडे म्हणाले की, बंदिस्त जल वाहिनीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नकसान होत आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करू. भविष्याचा विचार करता नागरिकांसाठी पाणी बचत व्हावी व पिण्यासाठी पाणी मिळावे.

पांडुरंग शेलार म्हणाले की, अनेक वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न रखडला आहे व पवना धरण मजबुतीकरण प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. ज्ञानेश्‍वर दळवी यांनी प्रास्ताविक केले. एन. एम. मठकरी यांनी आभार मानले. पवना बंदिस्त जल वाहिनी विरोधात शेतकऱ्यांच्या बाजुने लढा देणारे ऍड. विनायक अभ्यंकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)