पवनमावळातील ग्रामपंचायतीसाठी मतदान शांततेत

पवनानगर – मावळ तालुक्‍यातील चार ग्रामपंचायतींसाठी बुधवारी (दि. 26) मतदान झाले. पवनमावळातील तुंग, चावसर-केवरे व ठाकुरसाई-गेव्हंडे या तीन ग्रामपंचायतीचा समावेश होता. या सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झाले. तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच हे जनतेतून निवडून येणार असल्याने मतमोजणीकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.

पवनमावळातील चावसर-केवरे येथील ग्रामपंचायतीमध्ये 651 मतदारापैंकी 579 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. सुमारे 90 टक्‍के मतदानाची नोंद झाली. या गावात सरपंचपदाकरिता दोन तर सदस्य पदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. उर्वरित सदस्यांच्या सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुंग ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. तर सदस्यपदाच्या सात जागेसाठी 14 उमेदवार रिंगणात होते. सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच 70 टक्‍के मतदानाची नोंद झाली होती. येथे एकूण 699 मतदार होते; त्यापैकी 645 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

ठाकूरसाई-खडक-गेव्हंडे ग्रुप ग्रामपंचायतीमधील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथे सात जागापैकी चार जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित सदस्यपदाच्या तीन जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. तर सरपंचपदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे दोन्ही उमेदवार तगडे असल्याने लढत चुरशीची होणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 27) होणाऱ्या मतमोजणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)