पवई आयआयटीत वाहनांच्या काचा फोडून चोरी

मुंबई: मुंबईत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या धावपटूंना भूरट्या चोरट्यांच्या फटका बसला आहे. पवईत पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून वाहनातील लॅपटॉप, मोबाईलसारख्या महागड्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

पवई आयआयटी परिसरात धावपटूंनी आपली वाहने पार्क केली होती. मात्र चोरट्यांनी वाहनांच्या काचा फोडून आतील महागड्या वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात 12 वाहनांच्या काचा फोडल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यात अनेकांचे लॅपटॉप, मोबाईल फोन, बॅग आणि त्यातील रोकड अशा मौल्यवान वस्तू चोरी गेल्याची तक्रार आहे.
मुंबईतील पवई आयआयटीमध्ये हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरासह मुंबईतून अनेक धावपटू आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)