पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे – अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात तरूणाला 2 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सत्र न्यायाधीश एन.के.मणेर यांनी दिला आहे.
गगन सतीश लाड (वय 19, रा. लोहगाव) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ही घटना 14 ते 16 एप्रिल या कालावधीत मावळ तालुक्‍यातील टाकवे बुद्रुक आणि पुणे शहरात घडली. लाड याने पीडित मुलीला पळवून नेल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणच्या गुन्ह्यात लाड याला अटक केली. त्यावेळी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी लाड याला जामीन मंजुर केला होता. त्यानंतर पीडित मुलीची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी लाड याने लग्नाच्या अमिषाने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 4,8, 12 वाढविण्यात आले. पोलिसांनी लाड याला पुन्हा अटक करून विशेष न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याची सक्षमतेची चाचणी करण्यासाठी, त्याने त्याच्या मित्राच्या घरी नेवून तिच्यावर बलात्कार केला आहे. घटनास्थळी जावून तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)