पर्यावरण अहवालात असणार नागरिकांचा सहभाग

पिंपरी – राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार तीन वर्षांपासून महापालिका पर्यावरणाचा अहवाल तयार करत आहे. यावर्षीचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची तयारी सुरु झाली आहे. ज्यांनी वर्षभरात पर्यावरणविषयक चांगले उपक्रम राबवले आहेत, अशा संस्थांकडून पालिकेने त्यांच्या कार्यांची माहिती मागवली आहे. ही माहिती वार्षिक पर्यावरण अहवालात समाविष्ट केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यावरण सद्यस्थिती अहवालाचे काम हाती घेतले आहे. शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीय दृष्ट्‌या चाचणी करणे, नागरिकांना जीवनासाठी आवश्‍यक असे वातावरण तयार करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. याबाबतील राज्य शासनाने सर्व महापालिकांना दरवर्षी 31 जुलैपूर्वी पर्यावरणाच्या सद्यस्थितीवर अहवाला देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण अहवाल तयार करत आहे.

या अहवालामध्ये पालिकेच्या मूलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनीप्रदूषण आदीचा अभ्यास करुन विस्तृत माहिती दिली जाते. तसेच या अहवालाच्या माध्यमातून पालिकेस ही शहराच्या पर्यावरणाची स्थिती समजते व त्या दृष्टीने उपाययोजना करणे सोपे जाते. तसेच नागरिकांनी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांना पर्यावरणात अहवालात स्थान देऊन लोकसहभाग वाढवण्याचा आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या सामाजिक, शैक्षणिक संस्था किंवा नागरिकांनी पर्यावरणाबाबत चांगले कार्य केले आहे. झाडांची लागवड केली आहे. प्लॉस्टिक कमी करण्यासाठी वेगळे उपक्रम राबविले आहे. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, अशा नागरिकांकडून माहिती मागविली आहे.

पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास आणि त्याचे प्रमाणबद्ध मूल्यांकन करून दरवर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर केला जातो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पालिकेने 2017-18 च्या पर्यावरण अहवालाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी पालिकेच्या सर्व विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे. तसेच शहरातील पर्यावरणाबाबाबत नागरिकांडून लेख, सूचना मागविण्यात आल्या आहेत. या लेखाचा पर्यावरण अहवालात समावेश केला जाणार आहे. 15 जूनपर्यंत हा अहवाल तयार होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)