पर्यटनास चालना देण्यासाठी हेरिटेज वॉक आवश्‍यक

महापौर सुरेखा कदम ः दर रविवारी नगर दर्शनाचा उपक्रम हाती घेणार
नगर – पर्यटनाच्या माध्यमातुन शहर विकासाला चालना देण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. शिर्डी, शिंगणापुर येणाऱ्या देशभरातील नागरिकांना शहारातील पर्यटनाची माहीती व्हावी यासाठी महामार्गावर माहितीेचे फलक उभारण्यात येणार आहेत. शहारातील हॉटेल, लॉज आदी ठिकाणी पर्यटन स्थळांच्या माहितीचे फलक लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहरातील अनेक नागरिकांना युवकांना व विद्यार्थ्यांना आपल्या शहर व पर्यटनाची माहिती व्हावी यासाठी शाळांच्या सहाकार्यांने महिन्यातून एक दिवस पर्यटन सहल आयोजित करण्याचा मनपाचा मानस आहे. मनपाची शहर बस सेवा सुरू झाल्यानंतर दर रविवारी नगर दर्शनाचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. सद्या सुरू असलेल्या हेरिटेज वॉक हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
शहरातील पर्यटन स्थळांच्या विकासाला चालना देणे आवश्‍यक आहे.त्याची माहिती सर्वदूर पोजोचविली जावी. या माध्यमातुन शहराची पर्यटन केंद्र म्हणून ओळख निर्माण होईल. स्वागत अहमदनगरच्या पुढाकाराने सुरू असलेला हेरिटेज वॉकचा उपक्रमातून नागरिकांना पर्यतन स्थळांची माहिती होईल . पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असुन यासाठी महानगरपालिका सहकार्य करेल असे महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले.
स्वागत अहमदनगरच्या वतीने 22 एप्रिल रोजी आयोजित फराहबक्ष महाल येथील हेरिजेट वॉकच्या उपक्रमात महापौरांसह महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक सहभागी झाले होते. विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे, नगरसेविका मनिषा बारस्कर, शिवसेनेचे माजी प्रमुख संभाजी कदम, स्वागत अहमदनगरचे भूषण देशमुख आदीसह नागरिक यावेळी उपस्थित होते.
विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी या उपक्रमाचे कौतूक केले पर्यटनाला चालना मिळण्यास या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेरिटेज वॉक उपक्रमात पारनेर तालुक्‍यातील पानोली येथील गौरी इंगळे या अंध मुलीच्या गायनाचा कार्यक्रम पार पाडला या मुलीला पुढील वाटचालीस आर्थिक सहकार्याची गरज असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी तात्काळ रू. पाच हजारांची मदम जाहीर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)