परीक्षेनंतर शिका काही कौशल्ये

सतीश जाधव

परीक्षा संपली की सुट्टीत काय करायचे याचे आडाखे बांधले जातात. काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्यानंतर मोठी सुट्टी हाताशी असते. बहुतेकदा अभियांत्रिकी, व्यवस्थापन अशा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी हे बाहेरगावच्या महाविद्यालयांमध्ये शिकायला गेलेले असतात. त्यांना सुट्टीत घरी जावेसे वाटत असतेच, पण सुट्टीचा सदुपयोग करून एखादे नवे कौशल्यही शिकू इच्छित असतात. अशा वेळी काय करावे हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यावेळी मदत होऊ शकते ती ऑनलाईन ट्रेनिंगची. हा एक उत्तम पर्याय सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरतो आहे. प्रेरणा ही अशीच एक विद्यार्थिनी. वरिष्ठांनी सल्ला दिल्यावर तिने अँड्रॉईड ऍप डेव्हलपमेंटचा ऑनलाईन कोर्स करण्याचा विचार केला.

तिला “जावा’ या कॉम्प्युटरच्या भाषेचा काहीही गंध नव्हता. कारण तिने कधी शिकली नव्हती, पण या अभ्यासक्रमाची माहिती घेतल्यानंतर तिच्या लक्षात आले की आपल्यासारख्या नवशिक्‍यांसाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उत्तम होता. त्यामुळे अभ्यासक्रमाच्या शेवटी तिने कॅलक्‍युलेटर आणि नोटपॅड या दोन्हींसाठीचे ऍप बनवले होते. कॉलेज सुरू झाल्यावर तिला आपल्या ज्ञानाचा उपयोग करायची संधी मिळाली. तिने महाविद्यालयातील टेक फेस्टमध्ये आपल्या कॉलेजचे म्युचुअल बुक शेअरिंग ऍप निर्माण केले. त्यानंतर वर्षभरानंतर तिने कॉलेजच्या सामाजिक कल्याण समूहासाठी “उद्देश्‍य’ हे ऍप निर्माण केले. तिला आता ऍप डेव्हलपर म्हणूनच कारकीर्द घडवायची आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रेरणाप्रमाणे अनेक विद्यार्थी सुट्टीत घरबसल्या नव्या नव्या गोष्टी शिकण्यास इच्छुक असतात, पण नेमके कोणते कौशल्य शिकावे हे शोधणे हेच एक काम होऊन बसते. पण विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ज्या विषयात त्यांना आवड, गती आहे त्याच विषयात त्यांनी कौशल्य प्राप्त करण्याचे प्रयत्न करावेत. आपल्या आवडीचे क्षेत्र कोणते हे लक्षात येण्यासाठी थोडी माहिती गोळा करावी.

सुट्टीचा काळ हा नवीन कौशल्ये शिकून आपल्या शिक्षणात अधिक भर घालून बायोडेटा अधिक मजबूत होण्यासाठी मदतच करेल. आत्मविश्‍वासाने हे अभ्यासक्रम करावे आणि स्वतःला घडवावे. या प्रशिक्षणात शिकलेली कौशल्ये कारकिर्दीत यश मिळण्यासाठी फायदेशीरच ठरतील.

वेब डेव्हलपमेंट

एचटीएमएल, सीएसएस, बुटस्ट्रॅप, पीएचपी आणि माय एसक्‍युएल या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याविषयी काम करण्याचा अनुभवही मिळतो. संकेतस्थळे अर्थात वेबसाईट कशी काम करते हे समजण्यास मदत मिळते. त्याशिवाय युआय किंवा युएक्‍स म्हणजेच युजर इंटरफेस आणि युजर एक्‍स्पिरिअन्स म्हणजे काय हे समजण्यास मदत होते. वेब डेव्हलपमेंटचे काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या स्टार्टअप्स मध्ये इंटर्नशिप केल्यास काही अनुभव नक्कीच गाठीशी जमा होतो शिवाय थोडेफार पैसेही मिळू शकतात.

कोर जावा


या प्रशिक्षणात जावा आणि ऑब्जेक्‍ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे मूलभूत सिंद्धांत शिकण्याची संधी मिळते. ऐरेस, मेथडस्‌, इनहेरिटेंस, पॉलीमॉरफिस्म, क्‍लासीज इत्यादी. तसेच जावा एफएक्‍स विषयी देखील शिकता येईल.

ऑटोकॅड

या प्रशिक्षणात कॉम्प्युटरच्या सहाय्याने ऑटोकॅडमध्ये ड्राफ्टिंग आणि डिझायनिंग शिकायला मिळते.

अँड्रॉईड


यामध्ये अँड्रॉईड फोनसाठी ऍप कसे विकसित करायचे आणि त्यातील विविध सुविधा कशा निर्माण करायच्या हे समजते. त्यात फ्रंट एड डेव्हलपमेंट सीा एक्‍सएमएल आणि बॅक एंड डेव्हलपमेंटसाठी कोटलिन भाषा शिकायला मिळते.

सी आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंग

या प्रशिक्षणामध्ये आपल्याला सी प्लस प्लस आणि सी ह्या भाषेचे मूल्य, फंक्‍शन सेटस, जेनेरिक ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि आर्किटेक्‍चर ऑफ बिझिनेस सोल्युशन्स शिकवली जातात. आपल्याला सी प्लस प्लस शिकल्यास तिचा वापर करुन सॉफ्टवेअर बनवण्यात मदत होते

पायथन प्रोग्रामिंग


या प्रशिक्षणात पायथनची आवश्‍यक मूल्ये, ऑब्जेक्‍ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, एसक्‍यूलाईट डेटाबेसचा उपयोग आणि ऍप्लिकेशन्ससाठी जीयूआय डेव्हलपमेंट शिकायला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)