परिपाठाने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होतील 

बुगेः प्राथमिक शिक्षकांना समूह गायन प्रशिक्षण
पाथर्डी – विद्यार्थ्यांनी एकाच तालसुरात गाणी म्हणण्याच्या उद्देशाने शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण आणि परिपाठ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळेविद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, असा विश्‍वास शेवगावचेगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगेयांनी व्यक्‍त केला.
येथील श्री तिलोक विद्यालयाच्या सभागृहात 108 प्राथमिक शिक्षकांना समूह गायनाचेप्रशिक्षण देण्यात आले. यामुळे परिपाठासाठी निवडक गाण्यांचा सराव घेण्यात आला. गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड , विस्तार अधिकारी आशा शिरसाट, केंद्रप्रमुख अलका शिरसाट, प्रयागा बडे, दिगंबर चव्हाण, श्रीकृष्ण खेडकर, राजेंद्र गोल्हार उपस्थित होते.
बुगेम्हणाले, वारकरी संप्रदायामध्येहरिपाठाला जेवढे महत्त्व आहे तेवढे महत्त्व शाळेमध्ये परिपाठाला आहे. इंटरनेटच्या जमान्यात सुखाच्या मागेमाणूस धावत आहे. परंतु खरे मानसिक समाधान संगीत, गायन, वादन कलेतून मिळून मनाची एकाग्रता साधली जाते. विद्यार्थी एकाग्रचित्त झाला की सकारात्मक गुणग्राहक होतो. शाळांचा परिपाठ एकाच पद्धतीचा असला तर त्याचा हेतू लवकर साध्य होणार आहे. शिक्षक कोठेही बदलला किंवा वर्गशिक्षक बदलले तरी परिपाठाची गाणी व पद्धती समान असल्याने विद्यार्थी एकरूप होऊन चांगला प्रतिसाद देतील.
शाहीर भारत गाडेकर, सचिन साळवे, राजेंद्र चव्हाण, संजय राजगुरू, आयुब पठाण, अलका राजगुरू, बाबा जायभाय यांनी समूहगीत सादर करून सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले. प्रास्ताविक शिवाजी कराड यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)