परिंचे येथे बालशिक्षणक्रम प्रशिक्षण

परिंचे- परिंचे (ता. पुरंदर) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पुरंदर अंतर्गत आकार या बालशिक्षणक्रम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन जिल्हा परिषदचे सदस्य दिलीप यादव व पंचायत समितीच्या सदस्या अर्चना जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिंचे बीटच्या पर्यवेक्षिका निलम वाघ व हेमा अरणकल्ले उपस्थित होत्या.
निलम वाघ यांनी सांगितले की, आकार बालशिक्षणक्रम म्हणजे यापूर्वी अंगणवाडीमध्ये येणाऱ्या 3 ते 6 वयोगटातील मुलांना पालक, शिक्षक यांच्या मागणी नुसार भौगोलिक वातावरण शिकवावे लागत असे. त्यामुळे मुलांचा सर्वांगिण विकास, हसत खेळत शिक्षण म्हणजेच अनौपचारिक शिक्षण ही संकल्पना पुसटशी झाली आहे. त्यामुळे ही पुसटशी झालेली संकल्पना बदलावी यासाठी आकार योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांना कृतीतून शिक्षण मिळणार आले. सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात परिसरातील सर्व अंगणवाडीसेविका उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम व नळ कनेक्‍शन, वीज कनेक्‍शन या सारखे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)