परिंचे परिसरात कडकडीत बंद

परिंचे – मराठा आरक्षणाच्या पाश्‍वरभूमीवर परिंचे परिसरातील लोकांनी एकत्र येत उत्सफूर्तपणे बंद पाळला. यावेळी परिसरातील आंदोलनकर्त्यांनी एकत्र येऊन आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. या आंदोलनात
पुरंदर बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, परिंचे परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. अंदोलनाच्या वेळी कोणतीही हिंसक घटना घडली नसून, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परिंचे (ता. पुरंदर) परिसरातील पांगारे, यादववाडी, परिंचे वीर, माहूर, मांढर येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली होती. परिंचे एसटी स्टॅण्डच्या मुख्य चौकात परिसरातील आंदोलनकर्ते एकत्र आले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध व्यक्त करून, सर्व अंदोलक सासवड येथील मोर्चात सहभागी झाले. यावेळी परिंचे गावचे सरपंच समीर जाधव, कॉंग्रेसचे नेते मयूर मुळीक, सोसायटीचे अध्यक्ष नीलेश जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र धुमाळ, संतोष धुमाळ स्वप्नील जाधव आदी आंदोलनकर्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सासवड पोलिस स्टेशनचे विशाल रासकर, कैलास सरक आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. वीरचे पोलिस पाटील सोनवणे, परिंचे पोलीस पाटील अविनाश वाघोले आदी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. अंदोलनादरम्यान कोणत्याही हिंसक प्रकार घडला नसून, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)