परवानगी अभावी रखडला सिंहगड रोप-वे प्रकल्प

सार्वजनिक बांधकाम विभागाचे वन विभागाकडे बोट : 1.8 किमी लांबीचा रोप-वे

पुणे – सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे उभारण्यासाठी वन विभागाची जागा मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे. वन विभागाची जागा मिळाल्यानंतरच हा प्रकल्प उभारणे शक्‍य होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी होणारी वाहतूक कोंडी, दरड कोसळणे यामुळे रस्ता बंद करावा लागत होता. यामुळे पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी त्रास होत होता. सिंहगड किल्ला शहरापासून जवळ असल्याने पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आहे. त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी पावसाळ्यात नेहमी गर्दी होते. तसेच इतर शनिवार आणि रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जात असतात. सिंहगडवर किल्ल्यावर जाण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता अरुंद असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. त्याचबरोबर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे हा घाट रस्ता 10 ते 15 दिवस बंद ठेवावा लागतो. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. या त्रासातून पर्यटकांची सुटका करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर 1.8 किमी लांबीचा रोप-वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुविधेमुळे पर्यटकांना गडावर जाणे सोपे होणार आहे. तासाला सुमारे 100 पर्यटक रोप-वे ने किल्ल्यावर जाऊ शकतात.

सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आतकरवाडी येथून पायवाट आहे. या आतकरवाडी ते किल्ल्यावर असलेल्या दूरदर्शनच्या टॉवरशेजारी रोप-वे प्रकल्प साकारला जाणार आहे. मात्र, पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी येथील वन विभागाची काही जागा मिळत नसल्याने हा प्रकल्प कागदावरच राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)