परप्रांतीय कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

भुईंज, दि. 17 (प्रतिनिधी) – कदमवाडी (ओझर्डे) येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय तरुण कामगाराने मफ्रलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ओझर्डे कदमवाडी, ता. वाई येथील एका बिहारी तरुणाने राहत्या घरात शेडच्या अँगलला मफ्रलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओझर्डे कदमवाडी ता. वाई येथील ठेकेदार रोहित चंद्रकांत आपरे यांच्याकडे प्रमोद तपेश्वर यादव (वय 26, बिहार) हा गेल्या तीन महिन्यापासून सेंट्रींगच्या कामासाठी होता. तो व त्याचे इतर कामगार असलेले दोन मित्र असे तिघेजण कॉट्रॅक्‍टर रोहित आपरे याच्या पाठीमागे राहणारे शंकरराव शीळिंमकर याच्या घरात भाड्याने राहण्यास होते. दि. 16 च्या मध्यरात्री सोबतचे दोन मित्र झोपी गेल्याचे पाहून प्रमोद यादव याने राहत्या घरातीलच पत्र्याच्या शेडच्या अँगलला मफ्रलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घुटी पटेल (वय 33) या मित्रांला दि. 17 च्या मध्यरात्री झोप न लागल्याने उठून बसला त्यावेळी त्याला प्रमोद यादव याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना कळवले ठाण्याचे ठाणेअंमलदार एस. जे. घाडगे तातडीने घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह पोहाचून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी भुईंज प्रथमिक आरोग्य केंद्रात पाठवला, या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून त्याचा अधिक तपास एस. जे. घाडगे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.