परप्रांतीयांकडून तोडफोड, जाळपोळ

चाकण- चाकण येथे सोमवारी (दि. 30) पेटलेल्या मराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याचा संशय चाकण पोलिसांनी व्यक्त केला आहे. आंदोलनात घुसखोरी करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण दिल्याप्रकरणी चार ते पाच हजार अनोळखी वक्‍तींवर सामुहिक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.
दरम्यान, गिरीगोसावी यांनी चाकण पोलीस ठाण्यात बरेच दिवस काम केल्याने त्यांना चाकणमधील परिस्थितीचा अनुभव असून त्यांनी हे आंदोलन शांत करण्यासाठी आपल्या कल्पतेची प्रचितीदिल्याने त्यांना मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रभारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास भडकावणाऱ्या समाजकंटकांचा शोध सीसीटीव्ही, व्हॉट्‌सऍपवर व्हारल होणारे विडिओ तसेच गावातील नागरिकांच्या मदतीने अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले. तसेच चाकण पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये अनेकांना संशयीत म्हणून अनेकांना ताब्यात घेतले होते, तेच या आंदोलनात सहभागी झाले असावेत असा संशय पोलिसांना आहे. तसेच चाकण एमआयडीसी मोठी असल्याने येथे अनेक परप्रांतीय येथे कामानिमित्त राहतात, अशांवरही पोलिसांचा संशय आहे. कारण यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये अशा परप्रातीयांचा सहभाग उघड झाला आहे. या लोकांनीच अनेक पोलिसांना लक्ष करीत त्यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली, तर त्यांच्या वाहनांची तोडफोड करीत जाळपोळ केली असून एका पोलीस कर्मचाऱ्याला सात जणांच्या समुहाने बेदम मारहाण केल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)